अध्यक्षांचा संदेश JSB Satara

अध्यक्ष जनता सहकारी बँक, सातारा:

नाव: मा. मा. अतुल नारायण जाधव

पत्ता: ७०५, मंगळवार पेठ, सातारा.

जन्मतारीख: २०/०७/१९७१   – वय :४६ वर्षे

प्रिय खातेदारकांनो,

सातारा शहर व जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँक लि. साताराच्या चेअरमनपदी माझी नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. बँकेची स्थापना सन १९६३ साली झाली. त्यास आज उणेपुरे ५५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. आज अखेर बँकेच्या १६ शाखा असून बँकेचा सातारा जिल्ह्यात कार्यविस्तार आहे. बँकेच्या आजअखेर ठेवी १९२ कोटीच्या असून बँकेने १०८ कोटीचे कर्जवितरण केलेले आहे. बंकेच भांडवल पर्याप्त प्रमाण १३% असून बँकेच्या भक्कम आर्थिक स्थीतेचे द्योतक आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करत त्याचप्रमाणे सहकार कायद्यातील तरतुदींचे पालन करत बँक यशस्वीरीत्या वाटचाल करत आहे.

बँकेने ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदराच्या योजना त्याचप्रमाणे कमीत कमी कागदपत्रात त्वरीत मंजूर होणार्या विविध कर्जयोजना राबविल्या असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आमच्या बँकेत एन. ई. एफ. टी., आर. टी. जी. एस., ए.टी.म., रूपे कार्ड या सुविधा उपलब्ध असून आपले ए.टी.एम. कार्ड हे डेबिट कार्ड म्हणून देखील वापरता येते व विविध ठिकाणी त्याचा उपयोग खरेदी करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे आपल्या बँकेचे कार्ड भारतभर कोठेही उपयोगी पडणार आहे.

आजच्या बदलत्या बँकिंग व्यवस्थेमध्ये ग्राहकांच्या बँकेकडून असलेल्या अपेक्षा फार मोठया प्रमाणात वाढत आहेत. त्यांना तंत्रज्ञानावर आधारीत बँकिंग अपेक्षित आहे. आमच्या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुरूप कोअर बँकिंग प्रणाली अवलंबली आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक गतिमान व उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत.

ग्राहकाभिमुख सेवा देताना शाखांचे अंतरंग सुद्धा प्रसन्नचित्त असावे. यासाठी आपण टप्याटप्याने शाखांचे नुतनीकरण करत आहोत. सध्या बँकेच्या स्वमालकीच्या एकूण ५ इमारती असून इतर शाखांच्या इमारतीही भविष्यात स्वमालकीच्या होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शाखाविस्तार व व्यावसायवाढ हे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करीत आहोत.

आपली बँक आता खर्या अर्थाने आता गगनभरारी घेण्यास सज्ज झाली असून आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे. “सबका साथ सबका विकास” या घोषणेनुसार बँकेच्या विकासाच्या या प्रयत्नात आपण सक्रीय सहभागी व्हावे ही विनंती.

आपला विनीत,

मा. अतुल नारायण जाधव

Janata Sahakari Bank Facilties ATM, Locker, NEFT, RTGS

आपली बँक जनता बँक ……… सातारा

Janata Sahakari Bank Facilties ATM, Locker, NEFT, RTGS

आमचे तंत्रज्ञान सहकारी