सातारा शहर व तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी माधव सारडा तर व्हाईस चेअरमनपदी अविनाश बाचल यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्था सहाय्यक आयुक्त बाळासाहेब तावरे यांनी काम पाहिले.

सातारच्या जनता सहकारी बँकेच्या 55 वर्षांच्या इतिहासात अनेक वर्षे भागधारक पॅनेलची सत्ता होती व आहे. भागधारक पॅनेलचे भूतपूर्व जेष्ठ संचालक व माजी चेअरमन बाळासाहेब जाजू, कै. अॅड. यतिराज सारडा ऊर्फ काकाजी, भास्करराव शालगर, रतनशेठ लोया यांचे व त्यांच्या सहका-यांचे या बँकेवर सुमारे 30 ते 35 वर्षे वर्चस्व होते. त्या काळात बँक भरभराटीच्या अत्युच्च शिखरावर होती. मध्यंतरीच्या 7-8 वर्षांच्या काळत बँकेची परिस्थिती थोडी नाजूक झालेली होती आणि जनता बँक ही सभासदांना लाभांश सुध्दा देऊ शकत नव्हती. परंतु सुमारे 7 वर्षांपूर्वी बँकेचे भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन आणि अॅड. मुकुंद सारडा वगैरेंची साथ घेऊन 2010-11 साली भागधारक पॅनेलची नवीन बांधणी केली. तरुण व होतकरु कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये घेवून आणि जुन्या नव्या संचालकांचा मेळ घालून 2010-11 साली बँकेमध्ये पुन्हा भागधारक पॅनेलची सत्ता प्रस्थापित केली. मात्र काही जुन्या संचालकांनी 2016 साली वेगळी चूल मांडून दुस-या पॅनेलची उभारणी करुन 2016 ची निवडणूक लढवलली. परंतु भागधारक पॅनेलचे प्रमुक अॅड. मुकुंद सारडा, विनोद कुलकर्णी, बाळासाहेब जाजू आणि भास्करराव शालगर यांनी अतिशय हुशारीने आणि चाणाक्षपणाने योग्य त्या हालचाली करुन काही विरोधी पॅनेलमधून निवडून आलेल्या संचालकांचा भागधारक पॅनेलमध्ये समावेश करुन अतिशय सक्षम असे भागधारक पॅनेल 2016 साली उभे केले आणि सर्वच्या सर्व म्हणजे 21 संचालक प्रचंड मताधिक्याने निवडून आले. बँकेच्या इतिहासातील 21 विरुध्द शून्य असा तो एक विक्रमच होता.

2016 साली भागधारक पॅनेलची सत्ता पुन्हा जनता बँकेत आल्यानंतर पहिल्याच वर्षी जुन्या व जेष्ठ संचालिका श्रीमती चेतना माजगावकर यांच्याहाती चेअरमनपदाची सूत्रे सोपवण्यात आली आणि नवीन संचालक वजीर नदाफ यांना व्हाईस चेअरमन करण्यात आले. जनता बँकेमध्ये गेल्या सात वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत असलेले माधव सारडा यांची नूतन चेअरमन म्हणून एकमताने मंगळवारी झालेल्या निवडप्रक्रियेत करण्यात आली तर 2016 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रथमच निवडून आलेले अविनाश बाचल यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली.

जनता बँकेचे भूतपूर्व चेअरमन आणि सुमारे 25 वर्षे संचालक असलेले संचालक कै. अॅड. यतिराज सारडा ऊर्फ काकाजी यांचे माधव सारडा हे पुतणे आहेत. तर भागधारक पॅनेलचे प्रमुख अॅड. मुकुंद सारडा यांचे ते लहान बंधू आहेत. अविनाश बाचल हे मूळचे कोरेगावचे असून कोरेगाव व सातारा येथे त्यांचा उद्योग व्यवसाय आहे. माधव सारडा यांची जनता बँकेच्या संचालक मंडळावरील ही दुसरी टर्म असून त्यांनी यापूर्वी बँकेचे व्हाईस चेअरमनपद भूषवले आहे. माधव सारडा हे माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशन सातारचे अध्यक्ष असून गेली दहा वर्षे सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत अन्नदान करण्याचा प्रकल्प ते व त्यांचे सहकारी यशस्वीरित्या राबवत आहेत.

नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी तसेच अध्यासी अधिकारी तावरे यांनी बँकेच्या सर्व सेवकवर्गाने नूतन पदाधिका-यांचे अभिनंदन केले. या निवडीच्यावेळी बँकेचे संचालक जयवंत भोसले, निशांत पाटील, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, अमोल मोहिते, अशोक मोने, अतुल जाधव, वजीर नदाफ, चंद्रशेखर घोडके, वसंत लेवे, रामचंद्र साठे, अरुण यादव, रवी माने, नारायण लोहार, बाळासाहेब गोसावी, विजय बडेकर, संचालिका डॉ.श्रीमती चेतना माजगावकर, सौ.सुजाता राजेमहाडिक, तज्ञ संचालक धीरज कासट व ओंकार पोतदार, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक श्रीमती चित्रा पोरे, मच्छिंद्र जगदाळे, संजय क्षीरसागर, किशोर कारंडे, अधिकारी व सेवकवर्ग उपस्थित होते.

तसेच यावेळी सातारा शहरातील विशेष करुन भवानी, सदाशिव पेठ व खण आळीतील अनेक व्यापारी बंधू नूतन पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यासाठी बँकेमध्ये जमले होते. सातारा शहरातील जेष्ठ व्यापारी राधेशाम भंडारी, राधाकिसन लाहोटी, विनोदशेठ झंवर, सुभाषशेठ लोया, बाळासाहेब जाजू, विजय लोया, गिरीश लढ्डा, ओमप्रकाश लाहोटी, दिलीप लोया, शिरीष पालकर, भास्करराव शालगर, बाळासाहेब जाजू, मोहनशेठ सारडा, प्रमोद लाहोटी, सागर लाहोटी, नरेंद्र मिणीयार, उज्वल सारडा, संजय कासट, सुदीप भट्टड, अॅड. गोकुळ सारडा, दीपक नावंधर, श्रीकांत नावंधर, अॅड. सुधीर गोवेकर, दिपक नलावडे, रामदास जाधव, अनंतराव बलशेटवार, बबनराव सापते, सागर सारडा, राजेंद्र कासट, रामप्रसाद मिणीयार, पुरुषोत्तम लाहोटी, ॠषीकेश सारडा, शैलेश भंडारी, श्रीराम सारडा, गोपाळ धूत, जितेंद्र शहा, सुरेश सारडा, जितेंद्र भंडारी वगैर शेकडो व्यापा-यांनी व सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त सहकारी संस्था बाळासाहेब तावरे यांनी बँकेच्या सर्व संचालकांना मार्गदर्शन केले. तसेच भागधारक पॅनेलचे प्रमुख अॅड. मुकुंद सारडा व पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी यांनी नूतन पदाधिका-यांचे अभिनंदन करुन त्यांच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. सर्व संचालक मंडळाने एकमताने दोघांची निवड केल्याबद्दल अॅड. मुकुंद सारडा यांनी सर्व संचालकांचे अभिनंदन केले.