सातारा, दि. 23 – सातारा तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेच्या तज्ञ संचालकपदी धीरज राजेंद्र कासट, ओंकार संजय पोतदार यांची तर निमंत्रित संचालकपदी प्रितम सुरेश शहा, अजित सदाशिव साळुंखे यांची निवड करण्यात आली.
या निवडीमुळे कोरेगाव व नागठाणे या ग्रामीण भागाला बँकेत प्रतिनिधीत्व मिळाले.
नवनियुक्त संचालकांचा बँकेचे संचालक जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, जयवंत भोसले, अविनाश बाचल, माधव सारडा यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. धीरज कासट हे चार्टर्ड अकौंटट असून गेली चार वर्षे बँकेचे तज्ञ संचालक आहेत. ओंकार पोतदार हे एम.बी.ए. फायनान्स या पदवीन विभूषित आहेत. प्रितम शहा हे कोरेगाव येथील प्रथितयश भुसारी व्यापारी असून ते कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगावचे संचालक आहेत. त्याचप्रमाणे कारुण्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक आहेत.
अजित साळुंखे हे नागठाणे येथील चौंडेश्वरी सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सचिव असून विकास सेवा सोसायटी नागठाणेचे माजी व्हाईस चेअरमन आहेत. श्री. साळुंखे हे आण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय येथे उपशालाप्रमुख म्हणून कार्यरत असून गुजराथी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत. बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी नियुक्त सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांचा संस्थेच्या जडणघडणीत वाटा असून त्यांचे बँकेला असणारे सहकार्य असेच कायम राहील असे सांगितले. यावेळी नवनियुक्त संचालकांनी मनोगते व्यक्त करुन बँकेच्या संचालकपदी संधी दिल्याबद्दल भागधारक पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, अॅड. मुकुंद सारडा, चेअरमन अतुल जाधव व सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करुन बँकेच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहू असे सांगितले. याप्रसंगी कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक संजय पिसाळ यांनी प्रीतम शहा यांना निमंत्रित संचालकपदी संधी दिल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानून कोरेगाव शाखेच्या तसेच बँकेच्या प्रगतीत कोरेगाववासिय निश्चित हातभार लावतील असे सांगितले. त्याचप्रमाणे नागठाणे येथील संजय नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. बँकेचे व्यवस्थापक प्रशात शास्त्री यांनी प्रास्ताविक केले. व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी यांनी आभार मानले.
याप्रसंगी भागधारक पॅनेलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी, संचालक चंद्रशेखर घोडके (सराफ), रामचंद्र साठे, वजीर नदाफ, कोरेगाव येथील सचिन बर्गे, अजय बर्गे, मुरली शेठ, सुभाष बनसोडे, असिफ शिकलगार, गोपाळ धूत, महेश शहा, नागठाण्याचे सरपंच विष्णुपंत साळुंखे, कृषीभूषण मनोहर साळुंखे, आबाजी साळुंखे, विजय कदम, विलास बागल, अनिल साळुंखे, बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते.