जनता सहकारी बँक सातारा मध्ये आपले स्वागत
समाजातील सर्वसाधारण घटकांची आर्थिक उन्नती साधणे व समाजातील सर्व क्षेत्रातील आर्थिक अडचणी दूर करणे, या प्रमुख हेतूने सातारा शहरातील दूरदृष्टी असणा-या प्रतिष्ठित व नामवंत मान्यवरांनी एकत्र येऊन जनता सहकारी बँक लि. सातारा ची सुरुवात 7 मार्च 1963 रोजी केली व त्यादृष्टीने
एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ
या सहकारातील महामंत्राने प्रेरित होऊन व मंत्राची सतत जाण ठेवून समाजातील सर्वसामान्य घटकांपासून ते मोठया उद्योगाचा आर्थिक विकास करणारे कार्य सहकाराच्या माध्यमातून सदरची बँक गेल्या 55 वर्षाच्या कालखंडात करीत आलेली असल्याने सातारा जिल्हयातील जनतेच्या विश्वासाची व आपली बँक म्हणून या बँकेने जिल्हयात नावलैकिक प्राप्त केला आहे.
बँकेची सध्याची परिस्थिती पाहता, गेल्या 55 वर्षात बँकेने उत्तुंग यश संपादन केले असून बँकेचे भागभांडवल रुपये 8 कोटी 51 लाख इतके झाले आहे. सभासद संख्या 39094 असून बँकेच्या ठेवी रुपये 191 कोटी 50 लाखाच्या आहेत तर कर्ज 108 कोटी 27 लाखाची आहेत. तर भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) 11.90 टक्के इतका आहे.
सर्वसामान्यांचे हित जोपासून बँकेने केलेल्या कार्याची आकडेवारी पाहता बँकेची वाढ आता वटवृक्षासारखी झालेली आहे. बँकेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती म्हणजे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक व संचालक मंडळ या सर्वांच्या संयुक्त सहकार्याची फलश्रुती होय. बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक ही बँकेची स्फूर्ती व शक्तीस्थाने असून जनमाणसांचा फार विश्वास संपादन केल्यामुळे आज या बँकेचा नावलैकिक सातारा जिल्हयाभर होत आहे.
दिवसेंदिवस बँकिंग क्षेत्राकडून समाजाच्या अपेक्षा वाढत असून या अपेक्षाचा विचार करुन बँकेने सर्व स्तरांवर लोकाभिमुख धोरण आखले आहे. लॉकर्स सुविधा, माफक कमिशन दर, ए.टी.एम. सुविधा, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी. सुविधा, अल्प व दीर्घ मुदतीच्या विविध ठेव योजना बँकेने राबविल्या आहेत. बँकेचे नियम, सहकारी कायदा, भारतीय रिझवर्ह बँकेची बंधने यांची सुयोग्य सांगड घालून विविध प्रकाराचा पतपुरवठा बँकेकडून विनाविलंब केला जात आहे. संपूर्ण संगणक कामकाज सेवा, बँकिंग सेवा वगैरे विविध योजनांचा पाठपुरावा बँकेने चालू ठेवला असून या योजनाव्दारे बँक समाजाचे सामाजिक प्रश्नही सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार यांचे हित पाहत असताना सामाजिक बांधिलकी या नात्याने बँकेने समाजातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांच्या प्रगतीसाठी देणग्या व अनुदाने दिलेली आहेत. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या वाढीसाठी पतपुरवठा केलेला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी बँकेने पंतप्रधान फंड, मुख्यमंत्री फंड यांना आपली देणगी देवून खारीचा वाटा उचलेला आहे. कारगिल येथील युध्दात आपद्ग्रस्त झालेल्या भारतमातेच्या शूर वीरांचेसाठी बँकेने व सेवक वर्गाने रुपये 50 हजाराचा निधी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे. त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्यांना भरीव मदत वेळोवेळी केली आहे.
आपली बँक जनता बँक …. सातारा
आमचे तंत्रज्ञान सहकारी