कर्ज रक्कम: कमाल मर्यादेपर्यंत

कॅश क्रेडीट तारणी माल नजर गहाण

अ) रु. २५,००,०००/- पर्यत ११.००%
ब) २५,००,००१ चे पासून रु. ४९,९९,९९९/- पर्यंत १०.५०%

क) रु. ५०,००,०००/- व त्याचे वरती कर्ज रक्कमेस १०%

ड) वेअर हाऊस रिसिट तारण कर्ज
i) रु. ५०,००,०००/- पर्यत १२.०० %
ii) रु. ५०,००,००१/- वरील ११.०० %

टिप : वरील प्रमाणे केंश क्रेडीट व वेअर हाऊस रिसीट तारण नवीन कर्ज प्रकरण करीत असताना खालील अटी लागू होतील.

१) प्रोसेसींग फी कर्ज रक्कमेच्या २ %+ प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.

२) दर वर्षी नुतनीकरण करतेवेवेळी प्रोसेसींग फी रु.५०० +  प्रचलित दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.

३) वार्षिक उलाढाल कर्ज रकमेच्या ५ पट न झाल्यास पुढील नुतनीकरणाच्या वेळी  मंजुर रकमेला दसादशे १ % जादा व्याज आकारण्यात येईल.

४) कर्ज मंजुर रकमेच्या ९०% उचल न केल्यास शिल्लक रकमेवर १ % तिमाही व्याज आकारण्यात येईल.

५) स्टॉक स्टेटमेंट दरमहा महिन्याच्या दहा तारखेपर्यत द्यावी लागतील न दिल्यास १ % जादा व्याज आकारण्यात येईल.

६) सदर कर्ज प्रकरणाकरीता सहतारण म्हणून कर्जरकमेच्या प्रमाणात स्थावर मिळकत तारण द्यावी लागेल.

७) सदर कॅश क्रेडिट व वेअर हाऊस कर्ज योजना ही जुन्या कर्जाना लागू होणार नाही. अथवा सदर नवीन कर्ज व्याजदराचा लाभ घेता येणार नाही. व सदर नवीन कर्ज व्याजदराचा लाभ घ्यावयाचा असेल तर जुने कर्ज खाते पूर्णपणे बंद करुन नवीन कर्ज प्रकरणाकरीता लागणाऱ्या सर्व कागदपत्रासह कर्ज अर्ज दाखल करावा लागेल.

८) दिनांक ११/११/२०२२ नंतर नवीन मंजूर होणाऱ्या कर्जासाठी मा. संचालक मंडळ सभा दि. ३१/०३/२०२२ अन्वये मंजूर केलेल्या रिबेट योजने प्रमाणे रिबेट २% ऐवजी फक्त १ % राहील व योजनेतील उर्वरित सर्व नियम व अटी लागू राहतील.

जामीनदार : दोन

Membership : @ 2.5 % of Loan Amount.

सुरक्षा: कर्जाच्या गरजेनुसार आवश्यक

प्रक्रिया शुल्क: २ %

कालावधी: 1 वर्ष

कोण अर्ज करू शकेल: कोणतीही व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे आणि बँकेचा भागधारक आहे.