जनता सहकारी बँकेचा एकत्रित व्यवसाय 400 कोटीपर्यंत वाढवणार – माधव सारडा

बँकेची 55 वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात

जनता सहकारी बँक लि. सातारा या बँकेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे विद्यमान चेअरमन माधव सारडा यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली. व्यासपीठावर संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित व्यवसाय 400 कोटीपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

चेअरमन साराडा यांनी 2016-17 या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना चालू आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसाय 309 कोटीचा असून बँकेच्या ठेवी व कर्ज यामध्ये वाढ करुन बँकेचा एकत्रित व्यवसाय या आर्थिक वर्षात 400 कोटी पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

बँकेचे निव्वळ एन.पी.ए.चे  प्रमाण 3 टक्क्याच्या आत ठेवण्याच्या दृष्टीने कर्ज वसुलीचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगून रिझवर्ह बँकेच्या सूचनेप्रमाणे सी.आर.ए.आर चे प्रमाणे 11.90 टक्के ठेवण्यात यश आलेले आहे असे नमूद केले. त्याचप्रमाणे बँकेच्या ग्राहकांना ए.टी.एम. सुविधा उपलब्ध करुन दिली असून इतर अनेक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले. बँकेचे संचालक जयेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व सभेपुढील सर्व विषयांचे त्याचप्रमाणे आयत्या वेळच्या विषयांचे वाचन केले, त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. भागधारक पॅनेलप्रमुख अॅड. मुकुंद सारडा यांनी सहकारी बँक रिझवर्हे बँक व सहकार विभागाच्या धोरणानुसार चालते, त्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार बँकेने आवश्यक त्या तरतुदी करुन सूचनांचे पालन केले आहे, त्यामुळे बँक भक्कम पायावर उभी आहे. भागधारक पॅनेलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी यांनी चालू आर्थिक वर्षात सर्व सेवक व संचालक यांनी मिळून वसुलीचे नियोजन केले असून प्रामुख्याने जुन्या तसेच मोठया एन.पी.ए. खात्यात लिलाव करुन जास्तीत जास्त रक्कम वसूल करुन नफा क्षमता वाढविण्यास प्राधान्य देणार असल्याचे नमूद केले. सभेपूर्वी सभासदांना जी.एस.टी. व रेरा कायदा या विषयांवरील प्रशिक्षण देण्यात आले.

याप्रसंगी बँकेचे बहुसंख्य सभासद तसेच प्रतिष्ठित व्यापारी विनोद राठी, श्रीराम सारडा, बँकेचे कायदेशीर सल्लागार अॅड. एस.आर. मुंढेकर, अॅड.डी.एस.पाटील, अॅड.गोकुळ सारडा, अंतर्गत लेखापरीक्षक भूषण शहा, योगेश साळुंखे, बँकेचे व्हा.चेअरमन अविनाश बाचल, जयवंतराव भोसले, आनंदराव कणसे, अमोल मोहिते, अतुल जाधव, प्रा. अरुणकुमार यादव, निशांत पाटील, चंद्रशेखर घोडके (सराफ), रविंद्र माने, रामचंद्र साठे, वसंतराव लेवे, वजीर नदाफ, नारायण लोहार, डॉ.चेतना माजगावकर, सौ.सुजाता राजेमहाडिक, बाळासाहेब गोसावी, अशोक मोने, विजय बडेकर, तज्ञ संचालक ओंकार पोतदार, धीरज कासट, निमंत्रित संचालक सागर लाहोटी, हरिदास साबळे, सेवक संचालक राजन घोणे, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे, श्रीमती चित्रा पोरे, किशोर कारंडे, वसुली विभागप्रमुख रविंद्र डांबे, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.