सातारा, दि. – येथील जनता सहकारी बँकेस बँको पुरस्कार 2014 चा विशेष पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप बँक्स अॅण्ड क्रेडीट सोसायटीच जिल. दिल्लीचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांच्याहस्ते बँकेचे अध्यक्ष आनंदराव कणसे यांनी लोणावळा येथे झालेल्या समारंभात स्वीकारला.

सलग दहा वर्षे तोटयात असलेली जनता सहकारी बँक संचित तोटयातून बाहेर काढून बँक नफ्यात आणल्याबद्दल त्याचप्रमाणे अनेक अडचणींवर मात करुन बँकेची सांपत्तिक व आर्थिक स्थिती बळकट केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

2011 मध्ये बँकेच्या ठेवी 108 कोटी रुपये होत्या तर बँकेचा संचित तोटा 3 कोटी 64 लाख रुपये होता. त्यानंतर जून 2011 मध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या कार्यकालात प्रकाश गवळी यांच्या चेअरनमपदाच्या कालवाधीत ठेवी 127 कोटी रुपयांच्या झाल्या तर बँकेस 28 लाख रुपयांचा नफा होऊन संचित तोटा 3 कोटी 35 लाख रुपये एवढा राहिला. जयवंत भोसले यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकालात ठेवी 144 कोटी रुपये झाल्या तर एक कोटी 75 लाखांचा नफा होऊन संचित तोटा 1 कोटी 60 रुपये राहिला. जयेंद्र चव्हाण यांच्या चेअरमनपदाच्या कालवाधीत बँकेच्या ठेवी 161 रुपये एवढया झाल्या. तर कोटी 60 लाखाचा संचित तोटा पूर्ण भरुन निघून बँकेस 31 लाख रुपये 47 हजार एवढा निव्वळ नफा झाला. आजअखेर बँकेच्या 180 कोटी रुपये ठेवी असून 109 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. बँकेचा सी.आर.ए.आर. 12.36 टक्के आहे.

या सत्कार समारंभात अविज पब्लिकेशनचे अविनाश शित्रे-गुंडाळे, गॅलेक्सी कौन्सिलंगचे अशोक नाईक, पुणे जिल्हा उपनिबंधक नायकवडी, बँकेचे उपाध्यक्ष अतुल जाधव, संचालक जयेंद्र चव्हाण, प्रकाश बडेकर, अमोल मोहिते, जयवंत भोसले, विनोद कुलकर्णी, चंद्रशेकर घोडके, सेवक संचालक उमेश पाटील, व्यवस्थापक संजय अष्टपुत्रे, बँकेचे अधिकारी प्रशांत शास्त्री, राज्यातील विविध बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.